
पेण, ता. १६ (वार्ताहर) : पेण शहराच्या विकासाला अधिक गती देण्याचे काम आमदार रवींद्र पाटील यांनी केले असून शहरातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते तसेच तलावाचे सुशोभीकरण यासह विविध विकासकामांचे लोकार्पण नुकतेच आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
१५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन व आमदार रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पेण नगरपालिकेने शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला आमदार रवींद्र पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, सभापती आनंद जाधव, अफरीन आखवारे, कलावती पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, अभियंता सुहास कांबळे आदिंसह नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार रवींद्र पाटील म्हणाले की मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि गणेशमूर्तींमुळे संपूर्ण जगात पेणची ओळख असल्याने या शहराचा चेहरामोहरा बदलून टाकून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पेणच्या विकासकामांना अधिकचे गतवैभव प्राप्त करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.तर यावेळी शहरातील मुंबई- गोवा महामार्गाजवळील अंतोरे रोड ते रविराज फार्म हाऊस, परिट आळी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते भुंडा पूल यावरील काँक्रीटीकरणातील रस्ते, कवंडाळ तलाव, मोतीराम तलाव, सुशोभीकरण तर कासार तलावातील मुसिकल फाऊंटन, शंकर नगर येथील नमो उद्यान, चिंचपाडा रिंगरोड येथील छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरण आदिंचे उद्घाटन करण्यात आले.



Be First to Comment