Press "Enter" to skip to content

कोयना समाजाचा रक्तदानाचा विक्रम; तीन वर्षांत २५०७ रक्तबॉटलींचे संकलन

खोपोली ; प्रतिनिधी

कोयना समाजाचे दिवंगत नेते तथा कोयना रत्न कृष्णा मुसळे साहेब यांच्या स्मरणार्थ गेल्या तीन वर्षांपासून महारक्तदान अभियान राबविण्यात येत आहे. यंदा २ ऑगस्ट आणि १६ ऑगस्ट रोजी रायगड व ठाणे जिल्ह्यात आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये तब्बल ९५३ रक्तबॉटलींचे संकलन करण्यात आले.

पहिल्या वर्षी ६८६, दुसऱ्या वर्षी ८६८, तर यंदा ९५३ रक्तबॉटली संकलित झाल्याने सलग तीन वर्षांत एकूण २५०७ रक्तबॉटलींचे संकलन झाले आहे. कोयना समाजाने उभारलेला हा रक्तदानाचा विक्रम मानवतेच्या सेवेसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

“रक्ताला धर्म, जात किंवा पक्ष नसतो; रक्त फक्त जीवन वाचवते,” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. समाजाचे अध्यक्ष बळीराम शिंदे, सचिव बळीराम चव्हाण सर तसेच कार्यकारिणीतील पदाधिकारी सुरेश चाळके, शामकांत सावंत, राजेंद्र लाड, धनाजी सकपाळ, किसन जाधव, बाळकृष्ण मोरे आणि मिलिंद रेवणे यांनी या अभियानासाठी विशेष मेहनत घेतली.

उपक्रमाचे प्रमुख महेंद्र सावंत यांनी उत्कृष्ट नियोजन व आयोजन करत रक्तसंकलनाचा विक्रमी आकडा गाठण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनाला विठ्ठल मोरे, अशोक भाऊ जाधव, पांडुरंग साळुंखे, एम.डी. चाळके, उमेश कदम, लक्ष्मण जाधव, दत्तात्रय सकपाळ, सुभाष सावंत, नारायण कदम, शशिकांत शिंदे आणि शंकर निवळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तीन वर्षांत २५०७ रक्तबॉटलींचे संकलन हा केवळ आकडा नसून, कोयना समाजाच्या सामाजिक बांधिलकीचा आणि मानवसेवेच्या भावनेचा ठळक पुरावा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.