Press "Enter" to skip to content

“सुजलाम सुफलाम माझा देश” बालकलाविष्कारातून साकारला राष्ट्रभक्तीचा सोहळा पर्ण विकास मंच आणि युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम

पनवेल (वार्ताहर)-मुले हीच आपली गुंतवणूक असून स्टेटस च्या मागे लागू नका. देश सुजलाम सुफलाम करण्या करिता मुलांवर संस्कार करण्याचे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे सहआयुक्त, विचारवंत, साहित्यिक जमीर लेंगरेकर यांनी पनवेल येथे केले. पर्ण विचार मंच आणि युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान आयोजित “सुजलाम सुफलाम माझा देश” या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जमीर लेंगरेकर उपस्थित होते .अध्यक्षस्थानी आमदार विक्रांत पाटील उपस्थित होते.

वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने बालकलाकारांचा वाचन ,नाट्य, गायन, नृत्याविष्कार यांनी सजलेला सुजलाम सुफलाम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निवेदनासह संपूर्ण सादरीकरण हे बालकलाकारांनीच केले होते. धरती ,पाणी, शेती ,देश यावर आधारित असलेल्या कविता मुलांनी सादर केल्या तर वंदे मातरम चे महत्व आणि इतिहास सांगणारे अभिवाचन बालकलाकारांनी केले. आपणच आहोत. आपल्या धरतीचे शिल्पकार हे नाट्य यावेळी सादर करण्यात आले .स्पृहा मराठे हिचे कीर्तन विशेष उल्लेखनीय ठरले .तर बीज अंकुरे अंकुरे, आईसारखे दुसरे दैवत, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, धरतीची आम्ही लेकरं, मंगल देशा पवित्र देशा, क्रांती जिंदाबाद यासारखी ऊर्जा देणारी आणि धरतीची महती सांगणारी गाणी बालकलाकारानी सादर केली. सुजलाम सुफलाम धरती करायची असेल तर माती बरोबरच मन, समाज, कुटुंब सुद्धा सुपीक करावे लागतील. हा संदेश आता श्री जोशी हिच्या निवेदनातून दिला .पाणी, शेतकरी एकता या गोष्टी सुजलाम सुफलाम करण्यात महत्त्वाच्या ठरतात हा संदेश देणारी नृत्य यावेळी सादर करण्यात आली .सण उत्सवातूनही मनाची मशागत होत असते याकरिता संपूर्ण सणांचा आढावा घेणाऱ्या नृत्याने उपस्थित यांची वाहवा मिळवली. यावेळी वंदे मातरम चा नृत्यातून अविष्कार हा कार्यक्रमाचा मैलाचा दगड ठरला.

बालकलाकारांनी देशाप्रती सादर केलेल्या सर्वच सादरीकरणाने वातावरण देश भक्तीमय होऊन गेले होते.प्रास्ताविकात अपर्णां नाडगौडी यांनी पर्ण दिवाळी अंकाबरोबरच पर्ण विकास मंचच्या वतीने साहित्यिक सांस्कृतिक सामाजिक चळवळ राबत असल्याचे सांगितले तर युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्यावतीने मोहिनी विक्रांत पाटील यांनी झेन अल्फा आणि जेन झी मुलांवर सकारात्मक परिणाम करण्याकरिता संस्कार महत्त्वाचे असल्याने अशा पद्धतीचे प्रत्येक उपक्रम राबवण्यास आपण तयार असल्याचे सांगितले.आमदार विक्रांत पाटील यांनी देशाच्या प्रगतीत मुलांचा सहभाग महत्त्वाचा असून भारताकडे युवा देश म्हणून पाहिले जाते. विश्वगुरू म्हणून भारताची ओळख निर्माण करण्यामध्ये युवा पिढीचे महत्व मोठे असून त्यांच्यावर संस्कार होणे आवश्यक आहे. देशप्रेम म्हणून वेगळे काही करण्याची गरज नाही तर छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपण देशाप्रती खारीचा वाटा उचलू शकतो देशाला वैभवशाली करण्याकरिता समृद्ध करण्याकरिता बालमनाच्या विचारांना आकार देणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.पर्ण दिवाळी अंक 2025 च्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धांचे पारितोषिक वितरण यावेळी प्रमुख अतिथी जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंचावर प्रमुख अतिथी जमीर लेंगरेकर यांचे स्वागत अपर्णा नाडगौडी यांच्या हस्ते ,आमदार विक्रांत पाटील यांचे स्वागत कार्यकारी संपादक प्रशांत कुलकर्णी ,सुनिता खरे यांचे स्वागत कीर्ती जोशी यांनी केले. नगरसेविका स्नेहल ढमाले छाया पाटील मोहिनी पाटील यावेळी उपस्थित होते. कुटुंब व्यवस्था समृद्ध समाजाचे ताकद हा विषय निबंध स्पर्धकांसाठी देण्यात आला होता..प्रथम क्रमांक (विभागून)- नंदा कोकाटे, श्रद्धा वझे द्वितीय क्रमांक- (विभागून) अर्चना शुक्ल ,डॉ .अभय वळसंगकर , तृतीय क्रमांक -रेखा नाबर उत्तेजनार्थ -अद्वैत सोवळे ,वंदना ताम्हणे हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कीर्ति जोशी नमिता बुवा ,विनिता शेटे ,सई मराठे ,अर्चना जोशी, अमिता म्हसकर, जानवी करंदीकर यांचे सहकार्य लाभले. पनवेल मधील मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी आणि पालक यांनी या कार्यक्रमास भरगोस प्रतिसाद दिला. विश्वास शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.