Press "Enter" to skip to content

ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती

अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे हजारो गरीब व गरजू विद्यार्थ्यांना होणार मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्या वाटप

अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे हजारो गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्या वाटप करण्यात येणार आहे. हा भव्य समारंभ स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता एन डी स्टुडिओ चौक येथे संपन्न होणार आहे. या समारंभास प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ॲड. आशिष शेलार यांची लाभणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम उपस्थित राहणार आहेत.

शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे, समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठी हा छोटासा प्रयत्न करीत असल्याचे आयोजक अशोक छाजेड यांनी सांगितले. या कार्यक्रमास आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष ॲड संतोष खांडेकर यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.