
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 3 च्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे.
यापूर्वीचे परिमंडळ 3 चे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांची बदली नवी मुंबई गुन्हे शाखा येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी नवी मुंबई येथून मयुर भुजबळ यांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी परिमंडळ 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी वर्गांनी त्यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या.



Be First to Comment