Press "Enter" to skip to content

JWR मधील कामगारांना ३००० रुपयांची पगारवाढ  ; कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची मध्यस्थी

कोरोना काळात ज्यावेळी कामगारांना रोजगार मिळत नव्हता त्यावेळी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी शेकडो तरुणांना JWR पाडेघर येथे रोजगार मिळवून दिला व त्यांची रोजीरोटी सुरु ठेवली. जे कामगार तेव्हापासून नियमित काम करत आहेत त्या कामगारांना जुलै महिन्याच्या पगारामधे तब्बल ३००० रुपये पगारवाढ करण्यात कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे यशस्वी झाले आहेत.

कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. ललित जोबनपुत्र यांच्या बरोबर वारंवार चर्चा करून सौदर्य पूर्ण वातावरणात हि पगारवाढ करण्याचे मान्य करण्यात आले आहे. गणपती सणापूर्वी पगारवाढ मिळाल्याने कामगारांमधे आनंदाचे वातावरण आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.