
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप नेहमी नागरिकांच्या सोबत नागरिकांच्या आमरण उपोषणाल शेकाप चा जाहीर पाठींबा
पनवेल प्रतिनिधी :- कामोठे नागरिकांना ऐन पावसाळ्यात सुधा हक्काचे पाणी मिळत नसून पाणी प्रश्न जटिल बनल्याने शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे यांनी कार्यकारी अभियंता समोर नागरिकांना भेडसावत असलेला प्राणी प्रश्न मांडून लवकरच नागरिकांचा पाणी प्रश्न सोडवण्याचे विनंती केली.
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांचे नेतृत्वाखाली वारंवार कामोठेच्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले जात असून मागील वर्षी देखील कामोठेचा नागरिकांना पाणी मिळण्यासाठी आंदोलन केले होते असे वारंवार पाण्याचा प्रश्न उदबत असल्यामुळे शेतकरी कामगार पक्ष च्या वतीने आगामी काळात मोठे आंदोलन उभारणार असल्याचे शंकर शेठ म्हात्रे यांनी सांगितले असून येत्या प्रशासनाने त्याची ताबडतोब दखल घ्यावी.
यावेळी शंकरशेठ म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हे प्रश्न सत्ताधाऱ्यांनी सोडवायला हवे होते मात्र पालिकेपासून आमदार खासदार पर्यंत सत्ता भाजपचे असून सुद्धा कामोठेच्या नागरिकांना जाणीवपूर्वक पाणीटंचाई बास्वत असून आम्ही स्वतः मोरबे धरणाची पाणी केली असता मोरबे धरण फुल भरले असून वर्षभर पुरेल एवढे पाणीसाठा असून देखील कामोठेच्या नागरिकांना पाणीपुरवठा एक दिसाड होत असून यामुळे नागरिक मोठे संतापले असून येत्या काळात नागरिकांचा आंदोलन उपोषण आम्ही करणार असून त्याचबरोबर 14 ऑगस्ट रोजी नागरिकांचे आमरण उपोषण करणार आहेत त्याला आमचा जाहीर पाठिंबा असणार आहे आम्ही नागरिकांच्या सोबत असल्याचे शंकरशेठ मात्रे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी निवेदन देण्यासाठी उपस्थित शेतकरी कामगार पक्ष चे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे, माजी नगरसेवक प्रमोद भगत, राष्ट्रवादी कामोठे अध्यक्ष महेंद्र पाटील शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल, रमेश गोरे मधुकर प्रवक्ते सुरते,कृष्णा म्हात्रे,कुणाल भेंडे,ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष हरिचंद्र पाटील, अनिल पवार ज्योती म्हात्रे रोहन म्हात्रे नाना भगत, सर्जेराव माने शिवाजी आहेर, उत्तम मगर अनेक नागरिक उपस्थित राहून पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन दिले.




Be First to Comment