Press "Enter" to skip to content

जिल्हाध्यक्ष बाळा म्हात्रे यांच्याकडून राज ठाकरे यांना गणेशमूर्ती भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते जिते येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

पेण, ता. १० (वार्ताहर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई- गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान पेण तालुक्यातील जिते येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले.यावेळी त्यांनी सांगितले की या कार्यालयाच्या माध्यमातुन गोर गरीब, कष्टकरी, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात याव्यात. तर सदर उद्घाटन प्रसंगी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष बाळा म्हात्रे यांच्या कुटुंबाच्या वतीने राज ठाकरे यांना गणेशमूर्ती भेट देण्यात आली.

यावेळी त्यांच्यासमवेत मनसे नेते संदीप देशपांडे, योगेश परूळेकर, राजेश येरुणकर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाटील, कामगार सेनेचे पंकज शहा, महिला आघाडीच्या छाया शिंदे, पेण तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, सुदेश संसारे आदिंसह मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.