

पेण ( वार्ताहर) : ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन राज्यभर साजरा होत असतानाच पेण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि विविध आदिवासी संघटनांच्या माध्यमातून संपूर्ण पेण शहरात आदिवासी बांधवांनी पारंपारिक नृत्य सादर करत भव्य रॅलीच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी आदिवासी संस्कृतीचे रक्षण, संस्कृतीची परंपरा जतन करत खालुबाजा वाजवत या रॅलीतून संस्कृती दाखवण्यात आली.यावेळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदिवासी समाज बांधव एकत्र येत संपूर्ण शहरातून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकारी तेजस्विनी गलांडे, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वैशाली पाटील, आदिवासी आदिम कातकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विश्वास वाघ, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा, पंचायत समिती सदस्य सुशांत खाकर, आदिवासी संघटनेचे नेते जोमा दरवडा, हरेश वीर, रणजीत पवार आदींसह समाजातील कार्यकर्ते महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी आदिवासी बांधव, महिला यांनी रॅलीत विविध घोषणा देत डीजेच्या तालावर ठिक ठिकाणी नृत्य सादर करत असताना या नृत्यामध्ये प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनीही ठेका धरला असता उपस्थित समाज बांधवांकडून त्यांना टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला.या रॅली निमित्त पेण पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





Be First to Comment