Press "Enter" to skip to content

४०० ते ५०० विद्यार्थ्यांना आत्मरक्षणाचे धडे

एच डी पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल नढाळ व जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल मार्फत विद्यार्थ्यांनी ना स्वसंरक्षणाचे ( तायक्वॅान्डो) मोफत धडे

पनवेल (प्रतिनिधी ) एच डी पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल नढाळ , जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल व रायगड तायकवोंडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जवळपास ५०० विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापिका निशा पोलेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

त्या आपल्या भाषणात म्हणाले की, सुभाष पाटील हे आपल्या विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण देतात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थिनींना तायक्वॅान्डो या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवून दिली आहेत. शाळेतील विद्यार्थिनींना शारीरिक आणि मानसिक शक्तीला चालना देण्यासाठी तसेच कॉलेज आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याचा उद्देशाने त्यांना स्वयंसेरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींची सेड काढण्याचे प्रकार घडतात अनेकदा त्यांच्यावर वाईट प्रसंग ही वाढवतात अशी अनेक उदाहरणे सांगता येतील तेव्हा अशा प्रकारच्या घटनाही वारंवार घडतात महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत विशेषतः शाळेतील विद्यार्थिनींचे स्वयंरक्षणासाठी आत्मबल वाढले पाहिजे त्याचबरोबर मुलींनी गुन्हेगारी विरोधात लढण्यासाठी सक्षम व्हावे या उद्देशाने जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल अंतर्गत असे उपक्रम राबविण्यात येतात हे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय पंच सातवी डिग्री व मुख्य प्रशिक्षक सुभाष पाटील यांचे सहकारी अनिल म्हात्रे , रूपेश माळी ,अक्षता भगत , प्रसाद मुंडे , सानिका म्हात्रे , तनिस माळी इत्यादींचे मार्गदर्शन लाभले.

विशेष म्हणजे या सेमिनार साठी शाळेतील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या आणि त्यांनी ही प्रशिक्षण घेतले असे सुभाष पाटील नी पत्रकारांशी बोलताना सांगितले

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.