Press "Enter" to skip to content

ऑगस्ट क्रांती दिन हा जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल इंग्लिश मिडियम विद्यालयात साजरा


  • आवरे प्रतिनिधी( प्रोफेसर प्रशांत म्हात्रे ) आवरे येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  • सुरुवातीला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर आद्य क्रांतिवीर यांच्या स्मृतीला तसेच आत्माराम स्कूल मिशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
  • विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषण घेऊन स्वातंत्र्यसंग्रामातील जे जे महान क्रांतिकारी होते याविषयी जनजागृती जाहीर केली आणि या थोर व्यक्तींना विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भाषणातून असे दिसून आले की स्वातंत्र्यसंग्रमातील आद्य क्रांतिवीर यांनी जो काही लढा दिला तो लढा आपल्यासाठी एक प्रकारे प्रेरणादायी लढा आहे आणि या लढ्यामधून आजचे जीवन आपण कशा पद्धतीने जगायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केलं. अशा प्रकारे जनार्दन ठाकूर स्कूल इंग्लिश मीडियम विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन हा मोठ्या उत्साही वातावरणातं साजरा करण्यात आला यामध्ये विद्यालयातील मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.