Press "Enter" to skip to content

टेलिग्राम ट्रेडिंगच्या आमिषाने १९.९० लाखांची फसवणूक

मध्य प्रदेशातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल, दि.८ (वार्ताहर) : टेलिग्रामवरील बनावट ट्रेडिंग ग्रुपच्या माध्यमातून अधिक नफ्याचे आमिष दाखवून तब्बल १९ लाख ९० हजार १२५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला अज्ञात आरोपीने प्रथम व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर टेलिग्रामवरील @Mariam_VIP005 या ग्रुपमध्ये जोडत ऑनलाइन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. पुढे @BharatBharat_FNFD0001 या टेलिग्राम खात्यामार्फत ट्रेडिंगसंदर्भातील सूचना देत वेळोवेळी रक्कम गुंतविण्यास सांगण्यात आले.

काही दिवसांनी नफा झाल्याचे भासवून पैसे काढण्यासाठी आणखी रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली. अशा प्रकारे फिर्यादीची विश्वासार्हता संपादन करून आरोपींनी १९,९०,१२५ रुपयांची फसवणूक केली.

या प्रकरणाचा तपास करत असताना पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वपोनि बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजीत अभंग, पोलीस उपनिरीक्षक दुडे , पोलीस कॉन्स्टेबल काकडे आणि म्हात्रे यांनी सापळा रचून आरोपी योगेंद्र लोकेंद्रसिंह बैस (वय २३, रा. शिवपुरी, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.