

प्रतिनिधी(प्रोफेसर प्रशांत म्हात्रे ) आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे हे ओळखून ग्रामीण भागात जागतिक दर्जाची इंग्रजी भाषेचे बाळकडू हे आजच्या विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे हे स्वप्न उराशी बालगुण व पूर्णत्वास नेण्याचे काम 2006 साली आत्माराम ठाकूर मिशन संस्थेचे तर्फे जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल उभारून पूर्ण करण्याचं काम हे स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांनी या आवरे सारख्या ग्रामीण भागामध्ये केलं
हे नवल होय.
विद्यालयाची परिस्थिती पाहता या संस्थेत शिकणारा विद्यार्थी हा असं लिखित इंग्रजी बोलतो हे विद्यालयाचे वैशिष्ट्य. स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांनी अतिशय कठीण परिस्थितीतुन उच्चशिक्षित होण्याचा मान मिळविला. अशोक ठाकूर सर हे ग्रामीण भागामधून विज्ञान या शाखेमधून पदवीधर झाले हे आणखीन सरांचे वैशिष्ट्य होय. भविष्यकालात अध्यापनाचा डिप्लोमा पूर्ण करून शिक्षकी पेशा स्वीकारला. गणित विज्ञान व इंग्रजी सारखे कठीण विषय हे अगदी सहज व साध्या सोप्या भाषेत ते विद्यार्थ्यांना शिकवत तसेच इंग्रजी स्पिकिंग च्या माध्यमातून ठाकूर सरांनी अनेक विद्यार्थी व अशोका स्पीकिंग कल्लासेस च्या माध्यमातून डॉक्टर वकील व्यवसायिक लोकांना इंग्रजी बोलायला शिकवलं हे केवळ आणि केवळ आपल्याल लाभलेल्या उपजत बुद्धिमतेवर व केवळ शैक्षणिक व सामाजिक कार्य करून हे आपल्या समाजाचा उद्धार कशा पद्धतीने होईल हेच स्वप्न उराशी बाळगले.
अशोक ठाकूर सर यांनी ग्रामीण भागातला युवक हा केंद्र सरकारचा नेहरू युवा पुरस्कार मिलवू हे अशोक ठाकूर सर यांनी दाखवून दिले सर 2003 साली केद्र सरकारचा नेहरू युवक पुरस्कार मिळविणारे होय आज सर यांची 58 वी जयंती जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे मध्ये सरांना विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने विद्यालयातील विद्यार्थी मौर्य गावंड यानें आपले मनोगत व्यक्त केले तसेच निवास गावंड सर यांनी अशोक ठाकूर सर यांचे जीवनचरित्र पर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे मॅडम यांनी सुद्धा अशोक ठाकूर सरांविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं.
अशोक ठाकूर सर हे खरच विद्यार्थी प्रिय शिक्षक होते असे मत या श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित ज्ञानेश्वर गावंड सर यांनी व्यक्त केले सदर प्रसंगी सर यांच्या प्रतिमेस भावपुष्पांजली व अशोक ठाकूर सर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच विद्यार्थी विद्यालयातील शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा प्रकारे स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांची 58व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले


Be First to Comment