Press "Enter" to skip to content

गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर “आनंदगाणी” कार्यक्रम संपन्न


पनवेल दि. २७ः येत्या गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर नवीन पनवेल, सेक्टर ५ येथे “आनंदगाणी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संगीत शिक्षिका वंदना सहस्रबुद्धे आणि प्रतिभा कुलकर्णी यांच्या पनवेल परिसरातील शिष्यवर्गाने या कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतगुरू वंदना सहस्रबुद्धे, प्रतिभा कुलकर्णी, ब्राह्मण सभा नवीन पनवेलच्या अध्यक्षा दीपाली जोशी, सदस्या मंजुषा भावे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी गुरूंचे पूजन करण्यात आले. नंतर ‘आनंदगाणी’ या कार्यक्रमाचा प्रारंभ गणेशवंदना आणि गुरुभक्तिपर गीतांनी करण्यात आला. त्यानंतर विविध मराठी हिन्दी भक्तिगीते, भावगीतांचे सादरीकरण करण्यात आले. गंधार देशपांडे यानी सिंथेसायजर व माधव भागवत यांनी तबलासाथ केला. वरदा जोशी आणि समीर सोमण यांनी आपल्या ओघवत्या वाणीने अभ्यासपूर्ण निवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. मृणाल भागवत हिने तंत्रसहाय्य केले. पद्मनाभ व मुग्धा भागवत यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.