Press "Enter" to skip to content

पर्यावरणमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत वृक्षदिंडी व वृक्षारोपण


पनवेल, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या पर्यावरण व हवामान बदल मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त व संस्थेचे अध्यक्ष उत्तम शिंदे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल वसुंधरा समृद्धी फाउंडेशनच्या वतीने कळंबोली येथे पर्यावरण जनजागृतीसाठी वृक्ष दिंडी काढून गणेश विसर्जन तलाव परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

या सामाजिक उपक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष तथा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तम शिंदे यांनी केले होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मोठ्या उत्साहात वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर गणेश विसर्जन तलावाजवळ विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली.

या कार्यक्रमास उपमहापौर प्रमिला पाटील, नगरसेवक रामदास शेवाळे, नगरसेविका बायजा बारगजे, मोनिका महानवर, सरस्वती काथारा, भाजपा उत्तर रायगड जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील, भाजपा भटके विमुक्त मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, कळंबोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर , संत सावता माळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष नितीन जाधव, समाजसेवक लहूशेठ मलकमीर, तसेच पदाधिकारी सुनील रासकर, शशिकांत गोरे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून, अधिकाधिक वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प प्रत्येक नागरिकाने करावा, असे आवाहन केले. या उपक्रमामुळे परिसरात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.