
तृप्ती भोईर : उरण
बँक ऑफ महाराष्ट्र, नवघर शाखेच्या महिला मॅनेजर मनीषा गुप्ता यांच्या उद्धट वागणुकीविरोधात आणि अरेरावीच्या भाषेविरुद्ध नवघर परिसरातील महिला ग्रामसंघांनी पुकारलेला मोर्चा यशस्वी झाला आहे. राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे अखेर बँक प्रशासनाला आणि संबंधित मॅनेजरला महिलांच्या मागण्यांसमोर झुकावे लागले. हा विजय नवघर परिसरातील सर्व कष्टकरी आणि स्वाभिमानी महिलांचा असल्याच्या भावना ग्रामसंघांनी व्यक्त केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवघर परिसरातील नवघर महिला ग्राम संघ, साईबाबा महिला ग्राम संघ आणि कुंडेगाव महिला ग्राम संघ अंतर्गत एकूण ४० महिला बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटांचे बँकेत सुमारे ५०० खाती आहेत. मात्र, जेव्हा जेव्हा या गटांतील महिला आपल्या कामासाठी किंवा कर्जाच्या (लोन) चौकशीसाठी बँकेत जात, तेव्हा मॅनेजर मनीषा गुप्ता त्यांच्याशी अत्यंत अरेरावीची भाषा वापरायच्या. महिलांच्या कोणत्याही समस्या ऐकून न घेता सरळ नकार देणे, छोट्या कामांसाठी आठ ते दहा दिवस बँकेच्या फेऱ्या मारायला लावणे, असे प्रकार सातत्याने सुरू होते.
काही दिवसांपूर्वी एका गटाच्या महिला जेव्हा कर्जाची कागदपत्रे जमा करण्यासाठी गेल्या, तेव्हा मॅनेजर गुप्ता यांनी, “इथून निघून जा, मला तुमच्या गाववाल्यांचे तोंड पाहायचे नाही,” असे अत्यंत अपमान कारक शब्द वापरले तसेच कर्ज हवे असल्यास माझी माफी मागा तरच लोन मिळेल अशी अरेरावी ची अट घातली. मॅनेजरच्या सततच्या अपमानास्पद वागणुकीमुळे संतप्त झालेल्या तिन्ही ग्राम संघांच्या महिलांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर धडक मोर्चा काढला मॅनेजर मनीषा गुप्ता यांनी त्यांच्या उद्धट वागणुकीबद्दल जाहीरपणे मराठीत माफी मागावी आणि तात्काळ काम सोडून इथून निघून जावे या दोन प्रमुख मागण्यांवर या महिला ठाम होत्या. सुरुवातीला मॅनेजर गुप्ता यांनी या मागण्यांना तीव्र विरोध दर्शवला.
परिस्थितीची चिघळत असल्याचे पाहून ग्राम संघाच्या महिलांनी तात्काळ नगरसेवक अतुल ठाकूर यांच्याशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले अतुल ठाकूर यांच्या मध्यस्थीने उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर मॅडम आणि मनसेचे सतीश पाटील यांनी तातडीने आंदोलनात उडी घेतली लोकप्रतिनिधी आणि नेत्यांच्या दबाव नंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी प्राचार्य करण्यात आले अखेर महिलांच्या एकजुटी पुढे त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मॅनेजर मनीषा गुप्ता यांना नमते घ्यावे लागले व महिलांच्या मागण्या पूर्ण झाल्या.
हा विजय मिळवण्यासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर मॅडम मनसेचे नेते सतीश पाटील नगरसेवक नगरसेवक अतुल ठाकूर आणि जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा पाटील यांचे तिन्ही महिला ग्राम संघांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले हा कोणत्याही एका व्यक्तीचा विजय नसून अन्यायविरुद्ध एकत्र आलेल्या सर्व सामान्य कष्टकरी महिलांच्या एकजुटीचा आणि स्वाभिमानाचा विजय असे महिलांनी अभिमानाने सांगितले.



Be First to Comment