


आवरे प्रतिनिधी( प्रेम म्हात्रे)
विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला , सावळे सुंदर रूप मनोहर,खेळ मांडीयेला वाळवंटी घाई अश्या अनेक गीत भजन काव्य पंक्तीतून विठू नामाची महंती वर्णिली आहे. हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणजेच आषाढी एकादशी होय प्रत्येक वारकरी पायी पांडुरंगाच्या भेटीला जात असतात. आषाढी एकादशीचा महत्व जे आहे ते हिंदू धर्मातिल पवित्र सण आहे. या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी तर संत तुकारामांची पालखी देहू हुन पंढरीच्या दिशेने जात असते आणि या पालख्यांच्या पाठोपाठ हजारो वारकरी हे पांडुरंगाच्या नामाचा नाम जप करत भगवंताच्या नगरीत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत जात असतात.
आषाढी एकादशीला देवशयानी एकादशी सुद्धा म्हणतात. कारण या दिवसापासून भगवान विष्णू हे निद्रेत जात असतात आणि खरंच या दिवसापासून चातुर्मास सुद्धा प्रारंभ होत असते. आषाढी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करत असतात दिवसभर फळाआहार करत असतात. याच अनुषंगाने हिंदू धर्मात आषाढी एकादशी चे महत्व जनसामान्यांमध्ये पोहचवण्यासाठी स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांच्या स्वप्नातील विद्यालय म्हणजेच जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलमधील विद्यार्थ्यानी आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिंडीच आयोजन करण्यात आले होते.
दिंडी गावात निघण्यापूर्वी विठू रखुमाई व संत यांचे सन्मानपूर्वक औक्षण करून परमेश्वराच्या आरतीने सुरवात करून दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी हे दिंडीत सहभागी होत असतात. विठ्ठल रुक्माई तसेच संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम संत चोखामेळा संत जनाबाई असे अनेक संतांच्या वेशभूषा करत अवरे गावात मध्ये पंढरीची प्रती वारी काढली जाते. तसेच गावच्या बस स्थानक जवळ समाज प्रबोधन पर नृत्य पथनाट्य करून आवरे गावातील प्रसिद्ध मंदिर भोलानाथ मंदिरा मध्ये सुद्धा भजन कीर्तन करून या वारीचा सामाजिक संदेश हा विद्यार्थी लोकांपर्यंत पोहोचवत असतात.
अशा प्रकारे आषाढी एकादशीची वारी जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यासाठी विद्यालयातील शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक प्रतिनिधी हे सुद्धा विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन करीत असतात. या वारीमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला व आपल्या मधील विविध नृत्यकला व विविध कौशल्य ही जनसामान्यापर्यंत दाखविले.



Be First to Comment