Press "Enter" to skip to content

वेश्याव्यवसायातून 9 पीडित महिलांची सुटका; तळोजा पोलिसांची धडक कारवाई


पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः तळोजा पोलिसांनी वेश्याव्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत 9 पीडित महिलांची सुटका केली असून लॉज मॅनेजर व दोन वेटरांना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध मानवी वाहतूक व देहव्यापाराच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक मोघे व अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तळोजा परिसरातील हॉटेल अवॉर्ड इन, लॉजिंग अँड बोर्डिंग येथे महिलांना ठेवून वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. छाप्यामध्ये लॉजमध्ये 9 महिलांना वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आल्याचे उघड झाले. तसेच बनावट ग्राहकाकडून पैसे स्वीकारून महिलांना पाठविण्याची व्यवस्था आरोपी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी लॉज मॅनेजर बलराम बंजू गोडा तसेच वेटर गिरीश शेरस पुजारी आणि रुद्रराज शिवेशकुमार पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेशकुमार अंबटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करीत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.