Press "Enter" to skip to content

रामदास कदम यांच्या बेताल वक्तव्याचा पनवेल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला निषेध

पनवेल / प्रतिनिधी.
रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करून महायुतीमध्ये दरार निर्माण करणारे रामदास कदम त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. पनवेल शहर जिल्हा समन्वयक, माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना उपरोक्त भावना कळविल्या आहेत.
शिवसेना पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी निर्माण केलेली आदर्श संस्कृतीची परंपरा मोडीत काढून महायुतीला व पर्यायाने आपल्याच नेत्याला अडचणीत आणण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

      खासदार म्हणून देशाच्या सभागृहात प्रभावीपणे आपली भूमिका मांडणारे तटकरे साहेब यांनी  कधीही व कुणाच्याही बाबतीमध्ये कोणत्याही चुकीच्या पद्धतीने व्यक्तिगत टीका आजतायत केलेली नाही. याच कारणामुळे त्यांच्या बद्दल व्यक्त केलेल्या बेताल वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अतिशय व्यथित झालेले असून अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्याला यापुढे खपवून घेतले जाणार नाही अशी भावना ते व्यक्त करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.