

पेण, ता. १७ (वार्ताहर ) : पेण तालुक्यात मागच्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे दूरशेत आणि खरोशी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येऊन येथील जवळपास दोनशे ते अडीचशे कुटुंबांचे नुकसान झाल्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत पेण सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मावळ्यांनी सदर पूरग्रस्त कुटुंबाला जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.त्या जवळपास सत्तर टक्के नागरिकांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरून घरातील अनेक वस्तूंसह दैनंदिन जीवनासाठी लागणारे अन्नधान्याचे सामान देखील पुरामध्ये वाहून गेले होते.त्यामुळे दुरशेत आणि खरोशी या दोन गावांमध्ये पावसाच्या पुराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाल्याने येथील नागरिकांचे जनजीवन धोक्यात आले होते या गावातील जवळपास दोनशे ते अडीचशे घरांमध्ये पुराचे पाणी शिरून नुकसान झाले.
याबाबत शासनाच्या वतीने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असली तरी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण तालुका अध्यक्ष रोहीत केणी यांच्या पुढाकाराने येथील नुकसानग्रस्त कुटुंबांना घरोघरी जाऊन कांदे, बटाटे, तेल, मसाले, मीठ, तांदूळ, खोबरे, लसुण, हळद, डाळी आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रतिष्ठानचे मावळे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.



Be First to Comment