Press "Enter" to skip to content

मीटर टेस्टिंगची सुविधा पेण मध्येच उपलब्ध करा नगरसेवक प्रवीण पाटील यांची मागणी

पेण, ता. १५ (वार्ताहर) : महावितरण कंपनी कडून विज बिल जास्त येण्याच्या तक्रारी पेण शहरात वारंवार वाढत असताना त्यांना मीटर टेस्टिंग साठी अलिबाग येथे जावे लागत असल्याने पेणच्या महावितरण कार्यालयाने ही सुविधा इथेच सुरू करावी अशी मागणी नगरसेवक प्रवीण पाटील यांनी केली आहे.

पेण शहरासह परिसरातील अनेक नागरिकांच्या जास्तीच्या विज बिल संदर्भात येणाऱ्या तक्रारी पाहता संबंधित कार्यालय त्या नागरिकांना मीटर टेस्टिंगसाठी अलिबाग येथे पाठवून त्यांच्याकडून मीटर टेस्टिंग करून आणत आहेत यामध्ये येथील नागरिकांचा नाहक वेळ, पैसा तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने महावितरण कार्यालयाने सदर मीटर टेस्टिंगची सुविधा पेण मध्येच उपलब्ध करावी अशी मागणी पेण नगरपालिकेचे नगरसेवक प्रवीण पाटील यांनी महावितरण कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तर सदर निवेदनाची दखल घेऊन मीटर टेस्टिंगची सुविधा पेणमध्ये उपलब्ध करण्याबाबतचा योग्य निर्णय घेतला जाईल असे उपकार्यकारी अधिकारी केतन थत्ते यांनी यावेळी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.