Press "Enter" to skip to content

सीसीटीव्हीमुळे महामार्गावरील अपघात तसेच अनाधिकृत धंद्यांना आळा बसणार

वरसई फाटा येथे सीसीटीव्हीचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

पेण, ता. ५ (वार्ताहर) : पेण- खोपोली महामार्गावरील वरसई फाटा येथे सामाजिक कार्यकर्ते केतन तनपुरे यांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून या सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन दि. ४ रोजी पेणचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या वरसई परिसरात अनेक गावे, वाड्यावस्त्या येत असून हा विभाग महामार्गालगत आहे येथून दररोज येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने येथे वारंवार अपघात घडत असून यात अनेकांचे नाहक बळी गेले आहेत त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून गागोदे गावातील सामाजिक कार्यकर्ते केतन तनपुरे यांनी स्वखर्चाने वरसई फाट्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने यामुळे येथील अपघातासह अनाधिकृत धंद्यांना आळा बसणार आहे.

यावेळी पेण पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक निलेश रजपूत, सहाय्यक राजेश माने, पोलीस कर्मचारी व्हसकोटी, भोईर, हुले आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.