
पनवेल : सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल परिसरातील अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम होत असताना नागरिकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भालचंद्र पाटील तसेच नवीन पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळ यांनी अधिकारी व अंमलदारांसह स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.
पावसामुळे पाणी साचलेले रस्ते, संथ गतीने सुरू असलेली वाहतूक आणि निर्माण होणारी कोंडी यावर तात्काळ उपाययोजना करत वाहनचालकांना सुरक्षित मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वाहतुकीत अडकलेल्या नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करून कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सतत दक्षता घेण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भालचंद्र पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर वाहतूक शाखा व नवीन पनवेल वाहतूक शाखेतील अधिकारी आणि अंमलदार मुसळधार पावसातही कर्तव्य बजावत असून, त्यांच्या या सेवाभावी कार्याचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.



Be First to Comment