Press "Enter" to skip to content

पाण्यासाठी पळस्पे ग्रामपंचायतीवर धडकला ‘जनआक्रोश मोर्चा’

​पळस्पे (प्रतिनिधी):
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईला कंटाळून आज पळस्पे ग्रामस्थ आणि संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढला. “पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं”, “ग्रामपंचायत प्रशासनाचा धिक्कार असो” अशा घोषणा देत शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला वेढा घातला. आंदोलक महिलांनी ग्रामपंचायतीच्या दारात घोषना देऊन प्रशासनाचा तीव्र निषेध केला.

​पळस्पे गावात गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाच – पाच दिवस नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये चार चार दिवस येत नाहीत, ग्रामसेवक फोन घेत नाहीत प्रशासक लक्ष देत नाहीत, ग्रामपंचायत कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत.. ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेवटी गावकऱ्यांचा संयम सुटला आणि आज ग्रामपंचायत ऑफिस समोर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
​”आम्ही दरमहा पाणीपट्टी वेळेवर भरतो, मग आम्हाला पाण्यासाठी वणवण का करावी लागते? प्रशासनाला आम्हाला पाणी न मिळाल्याने जो त्रास होतो त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही,” असा संतप्त सवाल आंदोलक महिलांनी उपस्थित केला.

​मोर्चातील मुख्य मागण्या:
​गावात दररोज किंवा दिवसाआड पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा.
​पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची स्वच्छता करण्यात यावी.

​अनधिकृत नळ जोडण्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
​पाणी मिळेपर्यंत टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात यावा.

ग्रामपंचायत कर्मचारी यांनी ​आंदोलकांची भेट घेतली. “तांत्रिक बिघाड आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीमुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे.असे सांगितले पुढील दोन दिवसांत गावातील पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल,

​ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दिलेल्या मुदतीत पाणी न मिळाल्यास पंचायत समितीवर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

या मोर्चामध्ये गावातील माजी उपसरपंच मोहन गवंडी, माजी सरपंच रघुनाथ गवंडी, माजी उप सरपंच बंडू चौधरी, अनिल महालकर, बापु भगत,महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.