Press "Enter" to skip to content

स्वर्गीय अशोक ठाकूर सर स्मृती चषकावर कर्नाळा स्पोर्टस पनवेल कबड्डी संघाचे वर्चस्व

प्रतिनिधी गोवठणे (प्रेम म्हात्रे )

जे जे ठाकूर स्कुल आवरे शाळेच्या मैदानावर 6 जून 2026 रोजी स्वर्गवासी अशोक जनार्दन ठाकूर सर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ विद्यालयात जिल्हा स्तरीय कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या कबड्डी सामन्यामध्ये संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व राखत कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल या संघाने चुरशीचा खेळ दाखवत अतिशय चाणाक्ष अश्या सर्व बाबतीत बाजी मारत स्वर्गीय अशोक ठाकूर सर स्मृती चषकावर आपलं नाव कोरलं.

सदर स्पर्धा ही दिनांक 6 जून 2016 रोजी जानकीबाई जनार्दन ठाकूर शाळेच्या मैदानावर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडली. रायगड जिल्ह्यातील नामांकित 8 संघ या स्पर्धेत समाविष्ट झाले होते. सामने हे साखळी पद्धतीने खेळवण्यात आले. या स्पर्धेत विजेता कर्नाळा स्पोर्टस पनवेल हा संघ ठरला. उपविजेता सिद्धिविनायक संघ शहापूर व तृतीय सिद्धिविनायक नांदगाव तर चतुर्थ यजमान जे जे ठाकूर क्लब आवरे संघ ठरला.

या स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवर यांच्या हस्ते चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कबड्डी स्पर्धेचा बेस्ट प्लेयर म्हणून कर्नाळा स्पोर्टस पनवेल संघाची कानन हिला मिळाला तर डिफेंडर म्हणून सिद्धिविनायक शहापूर संघाची हर्षदा हिला मिळाला तर उत्कृष्ट रेडर म्हणून जे जे ठाकूर क्लब संघाची जाग्रवी हिला गौरविण्यात आले. सामन्याचे पंच पॅनल म्हणून नामांकित अनूरथ पाटील विश्वनाथ पाटील भालचंद्र पाटील व जयेश पाटील यांनी केलं. कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी आपली मनोगतात भावना प्रकट केल्या.

सर्व प्रथम मुकुंद गावंड यांनी आपले मनोगत व्यक्त करतना अशोक ठाकूर सर अतिशय मित भाषी व्यक्तिमत्त्व , सर्वामध्ये मिळून मिसळुन असायचे महेश गावंड सर यांनी मनोगत व्यक्त करताना आवरे गावात कौशल्य प्राप्त असा खेळ आपणास सर्वांना पाहायला मिळेल तसेच कार्यक्रमाचे अतिथी कृष्णा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना अशोक ठाकूर सर हे वैचारिक पातळीवर उच्च विचार सारणीचा माणूस होय अश्या व्यक्तीचा आदर्श सर्वांनी घ्यावा या कबड्डी स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर अतिथी म्हणून विकास भोईर (ब्लु स्टार फिशरी चे डायरेक्टर ) कृष्णा पाटील (दाहगाव माजी विद्यार्थी संघटना पिरकोन चे अध्यक्ष) अंकित म्हात्रे( सामाजिक कार्यकर्ते) मुकुंद गावंड( भारतीय जनता पार्टी उरण विभाग अध्यक्ष) महेश गावंड (शिक्षक संघटनेचे सल्ल्गार )अविनाश ठाकूर (जिल्ह्या परिषद सदस्य ) प्रारंभी गावंड( पंचायत समिती सदस्या) संस्थेचे खजिनदार वामन ठाकूर ,महादेव गावंड (माजी कबड्डी पट्टू) मनोज पाटील( सामाजिक कार्यकर्ते) अविनाश गावंड, हर्ष गावंड ,शेखर म्हात्रे सर ,सुधाकर गावंड ,सूर्यकांत ठाकूर प्रेम म्हात्रे(,यु ट्यूबर ) विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कबड्डी सामन्याचे समालोचन सुनिल वर्तक सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्रीडाशिक्षक शुभम ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी खुप मेहनत घेतली

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.