Press "Enter" to skip to content

आगरीसेना मा.प्रमुख राजाराम साळवी यांचे दु:खद निधन,राजकीय क्षेत्रात शोककळा


मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील )

आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी (वय ८०) यांचे ६ जून २०२६ रोजी सायंकाळी प्रदीर्घ आजाराने कळवा (ठाणे) येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. राजाराम साळवी हे ठाणे आणि कोकणातील आगरी समाजाचे बुलंद आवाज आणि एक लढवय्ये नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने सामाजिक, कामगार आणि राजकीय क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.

सामाजिक व शैक्षणिक कार्य: त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी ‘कामगार एकता’ ही संघटना स्थापन केली आणि ठाण्यातील कारखान्यांमध्ये कामगारांचे अनेक प्रश्न सोडवले. याशिवाय, त्यांनी कळवा येथे ‘मनीषा शिक्षण संस्था’ सुरू करून शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. राजकीय कारकीर्द: त्यांनी विविध राजकीय पक्षांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली. त्यांनी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदही सांभाळले होते. तसेच, भाजपमध्ये कार्यरत असताना त्यांनी गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यासोबत काम केले आणि महाराष्ट्र राज्य ‘ओबीसी महामंडळ’चे अध्यक्षपदही भूषवले होते.

अंतिम संस्कार: त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कळवा येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले असून त्यानंतर कळवा येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मा. साळवी साहेबांनी आगरी सेना स्थापन करून ३९ वर्ष पुर्ण झाली.त्यांना बहुजनांचे लाडके नेते संबोधले जात कोणीही अडचणी व समस्या घेऊन गेले तरी ते मार्गदर्शक म्हणून नेहमीच आदरणीय सर्वांच्या मनात बसलेले आज नेते हरपले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.