

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी व पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यातील वलप गाव परिसरातील ओसाड मालरानावर शेकडो वृक्षांचे रोपण करण्यात आले.
बदलत्या हवामानाचा विचार करता पर्यावरण संवर्धन व नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षारोपणामुळे वातावरण शुद्ध राहण्यास, जैवविविधतेचे संरक्षण करण्यास तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी हरित परिसर निर्माण करण्यास मदत होणार आहे.
यावेळी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्री. सुदाम पाटील, रायगड जिल्हा विधी विभाग अध्यक्ष ॲड. के. एस. पाटील, पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामचंद्र पाटील, पाले बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच गुलजार म्हात्रे तसेच कार्यक्रमाचे आयोजक पनवेल शहर जिल्हा पर्यावरण विभाग अध्यक्ष सुरेश पाटील आणि रायगड जिल्हा पर्यावरण विभाग अध्यक्ष राजीव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Be First to Comment