

जागतिक पर्यावरण दिनी पनवेलच्या कल्पतरू सोसायटी परिसरात वृक्षारोपण
पनवेल(प्रतिनिधी) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल शहरात विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या आवाहनाला प्रतिसाद देत कोशिश फाउंडेशनच्या वतीने पनवेलमधील कल्पतरू सोसायटी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेचा मुख्य शुभारंभ भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.यावेळी त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वसुंधरेला हिरवेगार करण्यासाठी प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.
या वेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, सभागृहनेते प्रकाश बिनेदार, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सुमित झुंजारराव, नगरसेविका दर्शना भोईर, श्वेता बहिरा, माजी नगरसेवक सुनील बहिरा, प्रभाकर बहिरा, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर सरचिटणीस अमित ओझे, रुपेश नागवेकर, प्रीतम धनाजी म्हात्रे, आदेश ठाकूर, प्रशांत शेट्ये, रोहित आटवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.


Be First to Comment