
आधी विधान परिषद निवडणुकीतून माघार आणी आता पनवेल महानगर पालिकेच्या विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा !
विशेष संपादकीय : विवेक पाटील ( संपादक सिटी बेल )
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून पक्षाने पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे यांना तिकीट दिले होते मात्र त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर आज सकाळी त्यांनी पनवेल महानगर पालिकेच्या विरोधी पक्ष नेता पदाचा राजीनामा दिला.
अरविंद म्हात्रे यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागे आणी पदाचा राजीनामा देण्याच्या मागे काय कारण असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अरविंद म्हात्रे यांच्या या निर्णया मागे अनेक कारणे असू शकतील. जसे की त्यांनी तटकरेंशी हातमिळवणी करून विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षाने त्यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिला ? किंवा पक्षाने अरविंद म्हात्रे यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले आणि म्हणून अरविंद म्हात्रे यांनी पक्षाच्या निर्णयावर नाराज होऊन विरोधी पक्ष नेता पदाचा राजीनामा दिला ?
आता या दोन्ही शक्यता कितपत खऱ्या आहेत हे अरविंद म्हात्रे हेच सांगू शकतात परंतु आज दिवसभरात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही त्यांनी आपला फोन बंद ठेवला असल्याचं आढळून आले आहे. आता पहुया या प्रश्नाच उत्तर आपल्याला मिळणार आहे का ?
अरविंद म्हात्रे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये आपल्यावर आरोप होत असल्याने आपण राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे परंतु उमेदवारी अर्ज का मागे घेतला याचे स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे जो पर्यंत ते स्पष्ट पणे भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावरील संशयाची सुई तशीच राहणार यात शंकाच नाही !


Be First to Comment