Press "Enter" to skip to content

शिवसेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

भाजप ही देशाला लागलेली वळवी, देशाला पोखरल्या शिवाय राहणार नाही ः माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते

पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः भाजप ही देशाला लागलेली वळवी आहे. तिला वेळीच फेकून दिली नाही तर देशाला, तुम्हा आम्हाला सर्वांना पोखरून मारून टाकेल. आता पेटून उठून मोठा संघर्ष करण्याची गरज आहे. पुढचा काल हा शिवसेनेचा असणार आहे. पनवेल शिवसेनेत स्पर्धा सुरू करणार आहे. यातून पदाधिकारी तयार होतील आणि या स्पर्धेतून पनवेल मध्ये शिवसेनेचे वादळ घोगवणार आहे. पुढची पनवेल महानगर पालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवून सत्तेत बसेल असा आत्मविश्‍वास शिवसेना जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना व्यक्त केला.

पनवेल मध्ये आपले हक्काचे घर या शिवसेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन अनंत गीते यांच्या हस्ते झाले त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले  पनवेल मध्ये मला शिवसेनेचे वादळ उभे करायचे आहे. आणि त्याची बांधणी मी लवकरच करणार आहे. शिवसेना आदेशावर चालतो.  हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावर आज विशाल सेना उभी राहिली आहे. तेव्हा नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्‍नासाठी पेटून उठले तर सत्ताधार्‍यांना त्याची दाद घावीच लागणार आहे.

यावेळी व्यासपीठावर उपनेते बबनदादा पाटील, संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सह संपर्क प्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दिपक निकम, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, उपपिजल्हाप्रमुख रामदास पाटील, महानगर प्रमुख अ‍ॅड.समाधान काशीद, गटनेत्या लिना गरड, माजी जिल्हा प्रमुख शिरीष बुटाला, माधव भिडे, तालुका प्रमुख संदीप तांडेल, ज्ञानेश्‍वर बडे, शहरप्रमुख प्रविण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, रामदास गोवारी, सुर्यकांत म्हसकर, प्रदीप केणी, नगरसेवक नितीन गावंड, प्रगती पाटील, रितीषा गोवारी, प्रिया गोवारी, मेघनाथ घाडगे, आर्या जाधव, उत्तम मोर्बेकर, यांच्यासह टीया अरोरा, सुजाता कदम, तसेच जेष्ठ शिवसैनिक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी,तसेच पनवेल महापालिका क्षेत्रातील शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त काही ज्येष्ठ व श्रेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार गीते यांचा शुभहस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना उपनेेते बबन पाटील यांनी सांंगितले की, शिवसेनेला 56 वर्षानंतर पनवेल मध्ये कार्यालयाच्या रूपाने आपल्याला हक्काचे घर मिळाले आहे.  शिवसेनेच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवक आला होता. त्या नगरसेवकाच्या मोबदल्यात आम्ही आज हक्काचे घर घेऊ शकलो. पनवेल मध्ये शिवसेनेचे कार्यालय नव्हते. आता आपल्या हक्काच्या कार्यालयातून सर्व जनतेची समाजसेवेची कार्य होणार आहेत. तर संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी भाजपच्या गलिच्छ, अती खालच्या दर्जाच्या राजकारणावर सडकून टीका केली. यावेळी ज्या शिवसैनिकांनी पनवेल मध्ये शिवसेना उभी केली आणि आतापर्यंत शिवसैनिक म्हणून अभिमानाने गर्वाने सांगत आहेत असा जेष्ठ पदाधिकार्‍यांचा सत्कार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.