Press "Enter" to skip to content

कडापे गावात जलजीवन नळपाणी योजनेचा शुभारंभ

प्रतिनिधी (प्रविण दासरे) पाणी हे जीवन आहे जल आहे म्हणून या भूतलावर जीवसृष्टी आहे जीवनातील आवश्यक घटक म्हणून पाण्याकडे पाहिलं जातं गेली अनेक दशके पाण्यापासून वंचित असणारी लोकवस्ती च गाव कडापे पाणी गावात येईल हे जणू काही मृगजळ सारख स्वप्न वाटत होतं पण ते सत्यात उतरण्यासाठी खूप कालावधी गेला अखेर रविवार दि. ३१/०५/२०२६ रोजी कडापे गावात जलजीवन नळपाणी योजनेचा शुभारंभ आठगाव पाणीकमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष व जि.प. सदस्य श्री अविनाश ठाकूर, आठगाव पाणी कमिटीच्या माजी अध्यक्षा आणि वशेणी ग्रा.पं. सरपंच सौ. अनामिका म्हात्रे, आवरे ग्रा.पं. सरपंच सौ. निराबाई पाटील, श्री हितेंद्र म्हात्रे सर आणि सर्व आठगाव पाणीकमिटी सदस्य यांच्या प्रयत्नांतून करण्यात आला.

ह्यावेळी कडापे पाणीकमिटीचे अध्यक्ष श्री. संतोष म्हात्रे, सचिव सरिता प्रशांत म्हात्रे, पाणीकमिटीचे सदस्य, कडापे गावचे ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



अनेक वर्षांच्या प्रतिक्षे नंतर कडापे गावात नळपाणी योजनेचे पाणी आल्याने सर्व ग्रामस्थ व महिला भगिनींच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. ह्यावेळी कडापे ग्रामस्थांनी सर्व आठगाव पाणीकमिटीचे आभार मानले.तसेच कडापे पाणीपुरवठा कमिटीचे अध्यक्ष श्री संतोष म्हात्रे आणि सर्व सदस्य तसचे कडापे गावातील महिला भगिनी यांच्या अथक प्रयत्नांणे कडापे गावातील पाण्याचा गंभीर असलेला प्रश्न सोडविल्याने कडापे ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कडापे गावातील आदर्श शिक्षक श्री अशोक म्हात्रे सर यांनी केले

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.