Press "Enter" to skip to content

आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांच्या हस्ते पालघर येथील आगरी सेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन


मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील )

सफाले आगरी सेना संघटनेच्या पालघर तालुक्यातील मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन विराथन बुद्रुक, सफाळे येथे संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री सत्यनारायणाच्या महापुजेने झाली. कार्यालयाचे उदघाटन आगरी सेना प्रमुख सन्मानिय श्री. राजाराम साळवी साहेबांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रम दुपार पासून ते
संध्याकाळ चालू होते भव्य रॅली काढून समारोप झाला.बिग बॉस फेम गायक संतोष चौधरी (दादूस)यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमा प्रसंगी महिलांच्या हळदीकुंकू समारंभ झाला.या भव्यदिव्य सोहळ्याचे नियोजन उत्तमरित्या पार पाडण्यात आगरी सेना जिल्हा प्रमुख चेतन गावड व त्याच्या सहकार्याने खुप मेहनत घेतली.
ह्या कार्यक्रमास श्री. प्रदीप राजाराम साळवी, श्री. कैलास पाटील (काका), चंदुलाल घरत, मेघनाथ पाटील, गजानन भोईर, मंगेश शेलार, चंद्रकांत ठाणकर,नारायण अंदाडे,रवींद्र पाटील, प्रकाश नरसाना,मनोज साळवी, संजय फुलोरे, संपत डावख, राहुल साळवी, सौ. मनिषा कैलास पाटील तसेच परिसरातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ अशा प्रकारे अनेक मान्यवर उपस्थित होते.

सदर सोहळ्यात समाजातील विशेष व्यक्तीमत्व असलेल्या विविध व्यक्तीच्या सन्मान शाल,सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन करण्यात आला. साहित्यिक लेखक कवी संजय पाटील मायखोपकर ,रमेश नथू पाटील,महेंद्र रामचंद्र पाटील,महेंद्र महादेव पाटील या साहित्यिकाच्या सह पंच्चाहतर डॉक्टर, वकील,आर्मी पोलिस ह्यांचा सन्मान करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.