Press "Enter" to skip to content

राष्ट्रीय रायफल नेमबाजी शिबिरासाठी आराध्य गिरिगोसावीची निवड


खोपोली प्रतिनिधी : दिनकर भुजबळ

न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), कोल्हापूर येथील एनसीसी कॅडेट आराध्य अजित गिरिगोसावी याची प्रतिष्ठित ‘ऑल इंडिया जी. व्ही. मावलणकर शूटिंग चॅम्पियनशिप’ या प्रि-नॅशनल नेमबाजी स्पर्धेच्या शिबिरासाठी निवड झाली आहे.

आराध्य हा धाटाव एमआयडीसी येथील राठी डाय केम प्रा. लि. कंपनीतील एचआर अँड अॅडमिन मॅनेजर पल्लवी गोसावी यांचा सुपुत्र असून, त्याच्या या यशामुळे कुटुंबासह कंपनीतही आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्रातून निवड झालेल्या ४० कॅडेट्समध्ये स्थान मिळवणारा आणि संपूर्ण कोल्हापूर बटालियनमधून निवड झालेला एकमेव कॅडेट म्हणून आराध्यने विशेष मान मिळवला आहे. त्याची पुढील कॅट-१ शिबिरासाठीही निवड झाली असून, आगामी टप्पे यशस्वीपणे पूर्ण केल्यास त्याला राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते.

त्याच्या यशामागे एनआयटीचे संचालक डॉ. संजय एच. दाभोळे, विभागप्रमुख प्रा. डी. पी. जगताप, रजिस्ट्रार बी. बी. राजिगरे, एनसीसी अधिकारी सौ. माधुरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आराध्यच्या या यशाबद्दल महाविद्यालय प्रशासन, राठी डाय केम परिवार आणि विविध मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.