Press "Enter" to skip to content

उत्तराखंड ( हल्दवानी – नैनिताल )येथे होणा-या राष्ट्रीय तायक्वांन्डो स्पर्धेसाठी रायगड चे सुभाष पाटील यांची स्पर्धा प्रमुख म्हणून निवड

पनवेल ( प्रतिनिधी ) इंटरनॅशनल इनडोअर स्टेडियम हल्दवानी नैनिताल येथे उत्तराखंड तायकवांडो असोसिएशन व तायकवांडो फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ओपन राष्ट्रीय तायक्वॅन्डो स्पर्धा २९ ते ३१ मे २०२६ रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी रायगडचे सुपुत्र तायकवोंडोचे आंतरराष्ट्रीय पंच व ७ वी डिग्री ब्लॅक बेल्ट यांची यांची तायकवोंडो खेळात निस्वार्थी तायकवोंडो राष्ट्रीय स्पर्धे साठी स्पर्धा प्रमुख म्हणुन निवड झाली आहे.

रायगडचे सुपुत्र सुभाष पाटील यांची तायक्वांदो खेळात निस्वार्थीपणे पंच प्रशिक्षक म्हणुन देशात व परदेशात आतापर्यंत करत आलेल्या उल्लेखनीय कामगीरी ची दखल घेत व त्यांच्या अनुभवाचा फायदा खेळाडू, प्रशिक्षक व पंच यांना व्हावा व भविष्यात देशातुन उत्कृष्ट पंच प्रशिक्षक व खेळाडू तयार होतील म्हणून देशातील या खेळाची अधीकृत शिखर संघटना तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया च्या पदाधिकाऱ्यांनी सुभाष पाटील यांची हल्दवानी नैनिताल येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायकवोंडो स्पर्धा प्रमुख पदी नेमणुक केली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल रायगड तायक्वांदो असोसिएसन, तायक्जांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) से पदाधिकारी / प्रशिक्षक व आमदार प्रशांत ठाकुर साहेब , विधान परिषदेचे आमदार विक्रांत दादा पाटील साहेब महापौर नितीन पाटील व नगरसेवक – मा. सभागृह नेता परेश ठाकुर सर यांनी विशेष अभिनंदन केले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.