Press "Enter" to skip to content

विविध सामाजिक, आरोग्य व रोजगाराभिमुख कार्यक्रम

शिवसेना जिल्हाप्रमुख नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पनवेल ता. 26 (बातमीदार) शिवसेना जिल्हाप्रमुख तथा पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, आरोग्य व रोजगाराभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी बांधिलकी जपत हा वाढदिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

रविवार, ३१ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत कळंबोली सेक्टर ३ ई येथील सुधागड शाळा हॉलमध्ये भव्य रोजगार व मोफत कोर्सेस मेळावा आयोजित करण्यात आला आहे. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहिती या मेळाव्यात दिली जाणार आहे.

सोमवार, १ जून रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, सेक्टर ३ ई, कळंबोली येथे सकाळी ९ ते ३ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याची तपासणी तसेच वैद्यकीय सल्ला या शिबिरात दिला जाणार आहे. याच दिवशी सकाळी ९ ते ३ दरम्यान मोफत नेत्र तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून गरजू नागरिकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सोमवार, १ जून रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत सुधागड शाळा मैदान (जुनी इमारत), सेक्टर ३ ई, कळंबोली येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक तनमय रामदास शेवाळे व रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

रामदास शेवाळे साहेबांचा वाढदिवस हा केवळ उत्सव नसून समाजसेवेची प्रेरणा आहे. युवकांना रोजगाराच्या संधी, नागरिकांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरे तसेच आध्यात्मिक कीर्तनाच्या माध्यमातून समाजाशी असलेली बांधिलकी जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सर्व उपक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, हीच अपेक्षा आहे.
– तन्मय रामदास शेवाळे(आयोजक)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.