Press "Enter" to skip to content

पनवेल-कर्जत रेल्वे मार्गिकेच्या कामाची खासदार श्रीरंग बारणे पाहणी करणार

मावळ – मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल ते कर्जत नवीन रेल्वे मार्गिका प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला असून प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेच्या सर्व स्थानकांची मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आज (मंगळवारी) रेल्वे अधिकाऱ्यांसह पाहणी करणार आहेत.

रेल्वे विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन खासदार श्रीरंग बारणे मंगळवारी सकाळी पाहणी दौरा करणार आहेत. कर्जत येथील रेल्वे कॉरिडॉरचीही पाहणी केली केली जाणार आहे. खासदार बारणे म्हणाले, कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग हा मुंबई महानगर प्रदेशातील एक अत्यंत महत्त्वाचा उपनगरीय रेल्वे प्रकल्प आहे. २९.६ किलोमीटर लांबीचा हा दुहेरी मार्ग कर्जत आणि पनवेल या दोन शहरांना थेट जोडणार असून, यामुळे प्रवासाचा वेळ आणि गर्दी लक्षणीयरीत्या कमी होईल. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी ३) अंतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतला. पनवेल ते कर्जत २९.६ किमी लांबीचा दुहेरी मार्गाचा प्रकल्प २,७८२ कोटी रुपयांच्या खर्चातून विकसित केला जात आहे.

या मार्गामुळे पनवेल आणि कर्जतदरम्यान पर्यायी लोकल सेवा सुरू होणार असून कल्याणमार्गे धावणाऱ्या रेल्वे वाहतुकीवरील ताण मोठ्याप्रमाणात कमी होणार आहे. सर्व मोठे आणि छोटे पूल, उड्डाणपूल (आरओबी), भुयारी मार्ग, बोगदे आणि अस्तरीकरणाची कामे बहुतांश पूर्ण झाली आहेत. कर्जत येथील रेल्वे उड्डाणपूल पूर्ण झाला असून सध्या रुळ जोडणीचे काम सुरू आहे. पनवेल रेल्वे उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.