Press "Enter" to skip to content

जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे विद्यालयाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा

प्रतिनिधी (सचिन पाटील) कुमारी नियती नरेंद्र ठाकूर या विद्यार्थिनीची रायगड जिल्हा खोखो अशी जिल्ह्यास्तरीय संघामध्ये निवड झाली आहे.

कु नियती नरेंद्र ठाकूर ही जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल विद्यालयाची विद्यार्थिनी होय लहानपणापासूनच अभ्यासात अतिशय हुशार वक्तृत्व खुप छान तसेच इतर सहशालेय उपक्रमात तरबेज व नृत्य असो किंवा इतर खेळ असो यात ती अग्रेसर तसेच विद्यालयातील क्रीडा शिक्षक शुभम ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्शल आर्ट्स कराटे चे शिक्षण घेत आहे. म्हणजे बहुगुणी होय आणि तिच्या या विशेष निवडीने सर्व स्तरावरून आनंद व्यक्त केला जात आहे व तिच्यावर कौतुकीची थाप दिली जात आहे तसेच सर्व स्तरावर तीचे अभिनंदन करण्यात येत आहे.

पहिल्यांदा नियतीच्या आई-वडिलांनी अभिनंदन केले आहे तसेच जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलचे विश्वस्त व खजिनदार श्री वामन ठाकूर सर अध्यक्ष प्रतिक ठाकूर सर विश्वस्त सौ अलका ठाकूर मॅडम आदिनाथ ठाकूर,सर सौ रीना ठाकूर मॅडम श्रीमती सिंधू ठाकूर मॅडम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे मॅडम शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नियतीचे विशेष कौतुक करण्यात आले आहे तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल च्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.