Press "Enter" to skip to content

मनसेच्या वतीने आदिवासी वडमाळवाडी येथील मुलांना खाऊ वाटप

पेण, ता. २४ (वार्ताहर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नवनिर्वाचित रायगड जिल्हाध्यक्ष बाळा म्हात्रे यांच्या माध्यमातून पेण तालुक्याच्या खारपाडा ग्रामपंचायत हद्दीतील वडमाळवाडी येथील आदिवासी वाडीतील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले आहे.

येणाऱ्या काळात महाराष्ट्रासह इतर जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत व्हावेत या दृष्टिकोनातून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी अनेकांकडून पक्षाचे पद काढून टाकली असून जो या पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करेल त्यालाच जबाबदारी देण्यात येईल हा उद्देश ठेवून त्यांनी रायगड जिल्हाध्यक्षपदी पेण तालुक्यातील बाळा म्हात्रे यांची निवड केली आहे.त्यामुळे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळा म्हात्रे यांनी पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी वाडी येथे मुलांना खाऊ वाटप केले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष बाळा म्हात्रे, महिला अध्यक्षा छाया शिंदे, कामगार सेना सरचिटणीस पंकज शहा, माजी उपजिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, देवेंद्र म्हात्रे, रोशन घरत, रमेश पाटील, राजू पाटील, जयेंद्र गायकवाड, हिरामण घरत, शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र भोईर, उपशिक्षिका शालिनी भोईर, हिरामण घरत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणे विद्यार्थी उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.