Press "Enter" to skip to content

हनुमान मंदिरात चोरी ; दानपेटीतील रक्कम आणि समयी चोरली


पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः पनवेल जवळील आर-2 या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दान पेटीतील रोख रक्कम तसेच एक समई चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
पनवेल जवळील चिंचपाडा तलावाजवळ सेक्टर आर-2 येथे हनुमान मंदिर असून या ठिकाणी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून मंदिरातील दानपेटी फोडून तेथे जमा असलेली रोख रक्कम त्याचप्रमाणे समई चोरुन नेली आहे. याबाबतची माहिती पनवेल शहर पोलिसांना देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.