Press "Enter" to skip to content

श्रमिक विद्यालय चिल्हेचा ९०% निकालतर सार्थक गोसावी प्रथम…


खांब,दि.८(नंदकुमार मरवडे)

इ.१० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे या विद्यालयाने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखून ठेवून याही वर्षी विद्यालयाचा एकूण निकाल ९०% इतका लागला असून सार्थक विनायक गोसावी या विद्यार्थ्यांने ८८.२० % इतके गुण संपादित करून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

विद्यालयाने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा या ही वर्षी कायम राखली असून विद्यालयाचा एकूण निकाल ९० % लागला आहे.तर द्वितीय क्र.तपस्या अशोक थिटे ८४.६०%, तृतीय क्र.अश्वित गजानन जंगम ८४.४०%, चतुर्थ क्र.कस्तुरी मनोज सुटू ८१.८०% तर पंचम क्र.रूद्र गणेश गोसावी ८०.२०% यांनी पटकावले आहेत.विद्यार्थी वर्गाच्या या सुयशाबद्दल संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे, उपाध्यक्ष प्रकाश थिटे, सचिव धोंडू कचरे व सर्व संचालक मंडळ तसेच,शा.व्य.समिती अध्यक्ष धनाजी लोखंडे,शाळा समिती अध्यक्ष राम मरवडे,मुख्याध्यापक दिपक जगताप व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच विभागातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी अभिनंदन व्यक्त करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.