Press "Enter" to skip to content

श्री.रा.ग.पोटफोडे (मास्तर) विद्यालयाच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम


खांब,दि.८(नंदकुमार मरवडे)

रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्री.रा.ग.पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब या विद्यालयाने इ.१० वी बोर्ड परीक्षेच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखून ठेवली असून विद्यालयाचा एकूण निकाल ८४.०९ % इतका लागला असून
ईश्वरी सुरेश अधिकारी या विद्यार्थ्यांनीने ८८.०० % संपादित करून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून इ.१० वी बोर्ड परीक्षेचा निकाल हा नेहमीच चांगल्या पद्धतीने लागला जात आहे.तर विद्यालयात द्वितीय क्र.रोहिणी निरंजन घोगळे ८७.४०%, तृतीय क्र.आयुष नितीन जाधव ८७.००%, चतुर्थ क्र.सई‌ सुरेंद्र तुपकर ८६.६०% तर पंचम क्र.आर्य अशोक शेळके ८५.२०% पटकावकाचछले आहे.विद्यार्थी वर्गाच्या या सुयशाबद्दल चेअरमन महेंद्र पोटफोडे, उपाध्यक्ष प्रकाश थिटे,सचिव धोंडू कचरे व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सुरेश जंगम व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच विभागातील शिक्षणप्रेमी नागरिक यांनी अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.