Press "Enter" to skip to content

पेण येथे तालुकास्तरीय कृषी मेळाव्याचे आयोजन

येत्या काळात शेती व्यवसायात आमुलग्राय बदल आणावा लागेल- कृषी सभापती वैकुंठ पाटील

पेण (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील शेतकरी अधिक विकसित होऊन तालुका पुरस्कार पुरता मर्यादित न राहता तो राज्य पुरस्कारापर्यंत पोहचला पाहिजे हा उद्देश ठेवून येत्या काळात शेती व्यवसायात आमुलग्राय बदल आणावा लागेल असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी पेण येथे बोलताना केले.

पंचायत समिती पेण व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कृषी मेळाव्याचे आयोजन आगरी समाज हॉल येथे करण्यात आले होते.या मेळाव्याला आमदार रविंद्र पाटील, जिप.सभापती वैकुंठ पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, कृउबा समिती सभापती महादेव मानकर, जिप.सदस्य प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, कर्जतचे कृषीतज्ञ डॉ.सागवेकर, पेण कृषी अधिकारी सागर वाडकर आदिंसह पंचायत समिती सदस्य तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.यावेळी पेण तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून अनेक शेतकऱ्यांना कृषी विषयी साहित्याचे वाटप करण्यात आले.

रायगड जिल्हा हे भाताचे कोठार म्हणून पुर्वी संबोधले जायचे परंतु आत्ताची परिस्थिती फार वेगळी आहे अनेक नैसर्गिक आपत्ती येत असताना शेतीची फार मोठी हानी होत चालली आहे त्यामुळे शेती व्यवसायाकडे शेतकरी वर्ग कमी प्रमाणात वळला आहे परंतु शेतकऱ्यांनी असे न करता शासनाच्या येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेत शेतीला अधिक पसंती द्यावी.

– आमदार रवींद्र पाटील
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.