
रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस चौकी उभारणे व पे अँड पार्क’ पार्किंग व्यवस्था सुरू करा – नगरसेविका ऍड शिवानी घरत
पनवेल दि.२० (वार्ताहर) : नवीन पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात पोलीस चौकी उभारणे व महापालिकेच्या माध्यमातून पे अँड पार्क’ पार्किंग व्यवस्था सुरू करावी अशी मागणी नगरसेविका ऍड शिवानी घरत यांनी पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
नवीन पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते विशेषतः रात्रीच्या वेळी महिलां सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी पोतीस चौकी उभारणे आवश्यक आहे, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था राखती जाईल आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल तसेच सदर परिसरात पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली असून अनेक वाहनधारकांकढून अनधिकृत पार्किंग केले जाते. स्टेशनच्या जवळच असलेल्या रिकाम्या जागेचा पोग्य वापर करून पनवेल महानगरपालिकेमार्फत तेथे पे बैंड पार्क पद्धतीने नियोजित पार्किंग सुविधा उभारण्यात यावी अशी विनंती आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल तसेच शिस्तबद्ध पार्किंगची व्यवस्था निर्माण होईल.
वरीत दोन्ही योजना राबविल्यास नवीन पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरातील सुरक्षितता वाहतूक व्यवस्यापनात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास आहे. आपण या मागण्यांची तातडीने दखत पेऊन योग्य ही कार्यवाही करावी अशी विनंतीचे निवेदन ऍड शिवानी घरत यांनी दिले आहे.



Be First to Comment