Press "Enter" to skip to content

पाणी परिषदेला माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांचा पाठिंबा


पनवेल दि.२० (वार्ताहर) : पनवेल शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आयोजितपाणी परिषद घेण्याच्या धोरणाला माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांनी पाठिंबा दिला असून यासंबंधीचे पत्र त्यांनी महापौर नितीन पाटील यांना सुपूर्द केले.

यानिवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, पनवेल शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आपण उचललेली पावले अभिनंदन आणि स्तुत्य आहेत ज्याद्वारे पनवेल मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मदत व्हावी म्हणून तातडीने पनवेलचे कर्तव्यदक्ष आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकाची न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना (टप्पा क्रमांक ३) चा पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी आढावा बैठक घेतली.

त्यानुसार त्यामध्ये असलेला शासकीय त्याचबरोबर जमीन अधिग्रहण किंवा नागरिकांकडून होत असलेल्या अडथळ्यांबाबत त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी व सोडवण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर +यांच्या सूचनेप्रमाणे आपल्या सहकारी नगरसेवकांवरती जबाबदारी सोपवणे म्हणजे सामान्यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करणारी घटना आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. त्याचबरोबर या विषयावरती आपण पाणी परिषद घेणार आहात हे ऐकून मनस्वी आनंद झाला की या आणि परिषदेद्वारे सर्वसामान्य जनतेला सामावुन घेऊन त्याची व्याप्ती वाढवावी व त्याद्वारे पाण्याचे महत्व पाण्याचा गैरवापर पाण्याचा योग्य वापर पाण्याचे पुनर्निर्माण बाबींमध्ये नागरिकांना दक्ष ठेवून आदर्श पनवेलच्या कल्पनेमध्ये अभिप्रेत पाणीपुरवठा निरंतर सुरळीत पनवेलकरांसाठी उपलब्ध होईल असे त्यांनी म्हटले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.