Press "Enter" to skip to content

रोहा तालुक्यातील उडदवणे गावची सुकन्या

प्रगती ठाकूर महाराष्ट्र पोलीस दलात रूजू

खांब,दि.२०(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील उडदवणे गावची सुकन्या असणारी प्रगती ठाकूर राज्य शासनाच्या पोलीस सेवेत रूजू झाली आहे.प्रगती ठाकूरच्या या निवडीमुळे व परिवार व उडदवणे गावाचे नाव उंचावले आहे.

कुटुंबाची परिस्थिती साधारण असताना देखील प्रगतीने आपली जिद्द आणि चिकाटी सोडली नव्हती. तिने पोलीस होण्याचे आपले स्वप्न त्याने पुर्ण करून दाखवले आहे.प्रगती ठाकूर पोलीस झाल्याने समस्त ठाकूर परिवारातून आनंद व्यक्त करून परिवाराचे वतीने तिचा यथोचित गौरवही करण्यात आला आहे.दरम्यान प्रगतीच्या या निवडीबद्दल समाजातील सर्वच स्तरातून तिचे अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे.


प्रगती ठाकूरने आपले पोलीस होण्याचे ध्येय शालेय जीवनापासून बाळगले होते.आज ते ध्येय प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे.प्रगतीचे पोलीस होणे हे इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
रविंद्र ठाकूर,
ठाकूर परिवारातील सदस्य

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.