Press "Enter" to skip to content

मंथन स्पर्धा परीक्षेत आरोही नांदूरे तालुक्यात प्रथम


खांब,दि.१७(नंदकुमार मरवडे)

रोहा तालुक्यातील प्रा.शाळा बाहे येथील गुणवंत विद्यार्थीनी आरोही माधव नांदूरे हिने मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे.

सध्याच्या स्पर्धात्मक जीवनात विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.या दृष्टीने विद्यार्थी-पालक व शिक्षकवर्गही अतिशय जागरूक झाले असून विविध स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवून त्यांच्या बुद्धीमत्तेची क्षमता तपासून पाहिली जात आहे.त्याच अनुषंगाने मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षाही फार महत्त्वाची समजली जात आहे.गेली अनेक वर्षांपासून मंथन राज्यस्तरीय परीक्षेसाठी संपूर्ण राज्यभरातून खुप मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देत आले आहेत.तर प्राथ.शाळा बाहे येथील गुणवंत विद्यार्थ्यीनी आरोही नांदूरे हिनेही या स्पर्धा परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करून तालुक्यात प्रथम तर रायगड जिल्ह्यात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे.

तिच्या या यशामध्ये तिचे शिक्षक श्रीमती जंगम,रूची सामंत व पालक यांचा मोठा वाटा असून तिने मिळविलेल्या सुयशाबद्दल समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.