Press "Enter" to skip to content

तळवली येथे गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा भक्तीभावाने साजरा


खांब (नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील श्री.क्षेत्र तळवली येथे संत शिरोमणी गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा ता.१५ रोजी भक्तीभावाने साजरा करण्यात आला.

स्वा.सु.गुरूवर्य अलिबागकर महाराज,धोंडुबाबा कोलाटकर, गोपाळ बाबा यांच्या कृपाशीर्वादाने व हभप गुरूवर्य दत्तू महाराज कोलाटकर (मठाधिपती पंढरपूर)यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या पुण्यतिथी सोहळ्याप्रसंगी देवतांचे अभिषेक व पूजाविधी, कळशस्थापना ध्वजारोहण,विणा पहारा व भजन,हभप मदन महाराज कोलाटकर यांची पुष्पवृष्टीपर किर्तनरूपी सेवा, दुपारी महाप्रसाद,सायं.हभप तुकाराम महाराज महाडिक यांची प्रवचन सेवा, सामुदायिक हरिपाठ तद्नंतर हभप भूषण महाराज वरखले यांची किर्तनरूपी सेवा व जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात आले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.