

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक (सीकेटी) विद्यालयात संस्थेचेचेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज (दि.१६) उच्च माध्यमिक विभागातर्फे संस्थांतर्गत शिक्षकांच्या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे सदस्य ऍड. राहुल घरत यांच्या हस्ते रस्सीखेच स्पर्धेचे उद्घाटन झाले. तसेच त्यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकविण्यात आला. संस्था सदस्य राहुल घरत यांनी सर्व सहभागीसंघांना शुभेच्छा दिल्या तसेच याप्रसंगी प्रास्ताविक करताना प्राचार्य प्रशांत मोरे यांनी स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करून सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी संकुलातील मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे, इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण,इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीलिमा शिंदे, पर्यवेक्षक अजित सोनवणे, कैलास म्हात्रे, स्वाती पाटील आदी विभाग प्रमुख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेत संस्थेतील आठ शाखांमधून एकूण १३ संघांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पुरुष शिक्षकांच्या एकूण ६ संघांनी तर महिला शिक्षकांच्या ७ संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील सहभागी पुरुष शिक्षकांच्या संघातून रामशेठ ठाकूर ज्युनिअर कॉलेज खारघर या संघाने प्रथम क्रमांक(रोख रक्कम रु. पाच हजार), चांगु काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय (ज्युनिअर कॉलेज) नवीन पनवेल या संघाने द्वितीय क्रमांक(रोख रक्कम रुपये तीन हजार) तर चांगु काना ठाकूर आर्ट्स,सायन्स अँड कॉमर्स सीनिअर कॉलेज खांदा कॉलनी या संघाने तृतीय क्रमांक(रोख रक्कम रु.दोन हजार)पटकावला.
तसेच या स्पर्धेतील सहभागी महिला शिक्षकांच्या संघातून श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालय द्रोणागिरी या संघाने प्रथम क्रमांक(रोख रक्कम रु. पाच हजार ), मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि टी एन घरत ज्युनिअर कॉलेज गव्हाण या संघाने द्वितीय क्रमांक(रोख रक्कम रुपये तीन हजार)तर चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय(ज्युनिअर कॉलेज) नवीन पनवेल या संघाने तृतीय क्रमांक(रोख रक्कम रु.दोन हजार)पटकावला. संस्थेचे सदस्य राहुल घरत यांच्या हस्ते सर्व विजेत्या संघाचा रोख बक्षीस रक्कम, आकर्षक ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ क्रीडाशिक्षक अरुण पाटील तसेच मनोज पाटील, माधवी कोळी, रामहरी मस्के, मनोहर महाजन, तृप्ती जोशी, दीप्ती वालम, अमृता देशमुख यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.विज्ञान विभाग सहशिक्षिका अपर्णा मुकणे, तसेच वाणिज्य विभाग सहशिक्षिका योगिता जोरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विज्ञान विभाग सहशिक्षिका तृप्ती जोशी यांनी स्पर्धेचे व्हिडिओ चित्रण केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, सर्व विद्यार्थी स्पर्धक, शिक्षक, क्रीडा समिती सदस्य, परीक्षक यांचे आभार व्यक्त करून सर्वांच्या संयुक्त सहकार्याने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले.






Be First to Comment