Press "Enter" to skip to content

ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे थ्री स्टार राज रिसॉर्ट

दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे खानसामा राज रिसॉर्ट येथे रुजू

पनवेल / प्रतिनिधी.
पनवेल तालुका परिक्षेत्रातील राज रिसॉर्ट हे पहिले थ्री स्टार रिसॉर्ट ठरले आहे. माजी नगरसेवक संतोष उरणकर संचलित या रिसॉर्टने अल्पावधीतच देशी आणि परदेशी ग्राहकांच्या मनात घर केले आहे. मॅरेज लॉन, अद्ययावत पविका रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, वातानुकूलित बँक्वेट हॉल, आणि प्रशस्त रूम्स असणाऱ्या राज रिसॉर्ट हे परफेक्ट व्हेकेशन स्पॉट आणि मॅरेज डेस्टिनेशन ठरत आहे.

राज रिसॉर्ट हे पनवेल तालुक्यातील उसर्ली बुद्रुक या गावी निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. नैसर्गिक हिरवळी सोबतच संतोष उरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या गार्डन टीमने येथे देशी आणि विदेशी झाडांचा समन्वय साधत वृक्ष राजी फुलवली आहे. ग्राहकांची सोय सुविधा यांचा अत्यंत काटेकोरपणाने अभ्यास करून लिफ्ट, लॉन, स्टेज, फूड एरिया यांचे नियोजन या रिसॉर्ट वर करण्यात आले आहे. फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, इटली येथील पर्यटकांनी राज रिसॉर्टच्या पाहुणचाराचा आस्वाद घेऊन त्यांची प्रशंसा केलेली आहे.

राज रिसॉर्ट मध्ये उत्तम दर्जाचे पविका रेस्टॉरंट कार्यान्वित करण्यात आलेले असून गरमागरम आणि ताजे सकस खाद्यपदार्थ येथे शिजवले जातात. विशेष उल्लेखनीय म्हणजे या रिसॉर्टचे शेफ मनोज पाटील यांनी तब्बल नऊ वर्षे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे खानसामा म्हणून काम केलेले आहे. एपीजे अब्दुल कलाम डी आर डी ओ येथे असताना शेफ मनोज पाटील त्यांच्यासाठी जेवण बनवायचे. मूळचे अलिबाग तालुक्यातील असणारे मनोज पाटील यांच्या हाताला अप्रतिम चव असून एकदा त्यांच्या हातचे जेवलेली व्यक्ती त्यांची आठवण संपूर्ण आयुष्यभर जपून ठेवते.

ढाबा कल्चर आणि चायनीज ठेल्यांची रेलचेल असणाऱ्या पनवेल तालुका ग्रामीण विभागात सर्व परवाने आणि परवानग्या घेऊन शंभर टक्के अधिकृत रिसॉर्ट या ठिकाणी चालविण्यात येते. त्यामुळे या रिसॉर्टवरती व्हेकेशन अथवा कौटुंबिक कार्यक्रमाचा आस्वाद घेताना सर्व गोष्टी लीगल असल्यामुळे ग्राहक निर्धोकपणे येथे आपापले कार्यक्रम एन्जॉय करतात. निवासासाठी निर्माण केलेल्या खोल्यांच्यातील फर्निचर आणि अंतर्गत सजावट स्वतः मालक संतोष उरणकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेली आहे. येथे वास्तव्य करणाऱ्या ग्राहकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की भरपूर सूर्यप्रकाश, खेळणारी हवा आणि खिडकीतून बाहेर डोकावले असता दिसणारा अमर्याद निसर्ग यामुळे येथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते.
टापटीप स्वच्छता, मुबलक पार्किंग या राज रिसॉर्टच्या जमेच्या बाजू आहेत. टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम अशा खेळाचा आस्वाद ग्राहक या ठिकाणी घेऊ शकतात. हल्ली फार प्रचलित असणारी आणि ग्राहकांना “बिन मोसम बरसात चा” आनंद मिळवून देणारी रेन डान्स फॅसिलिटी देखील येथे उपलब्ध आहे.केवळ भोजनाचा अथवा मद्यपानाचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या सेवेमध्ये येथील डेडिकेटेड पविका रेस्टॉरंट अँड बार सदैव तैनात असतो. स्पा आणि मसाज ही सशुल्क सेवा देखील येथे उपलब्ध आहे.

ग्राहकांना हवा असलेला मेन्यू, हिरवीगार लॉन, पुल साइड डायनिंग व्यवस्था, सुग्रास जेवण आणि राहण्यासाठी भरपूर रूम्स यामुळे डेस्टिनेशन वेडिंग साठी राज रिसॉर्ट ही पहिली पसंती बनत आहे. राज रिसॉर्ट येथे कार्यक्रमाचे आयोजन करायचे असल्यास वाचकांनी 9819344222 या क्रमांकावर संपर्क साधावा.

शेडूंग टोल नाक्यापासून ते थेट चिंध्रण, वावंजे या ग्रामीण विभागीय पट्ट्यात अधिकृत रेस्टॉरंट किंवा बार नाहीत. थ्री स्टार राज रिसॉर्ट हा एकमेव पर्याय ग्राहकांसाठी सेवा प्रदान करत आहे. आज राज रिसॉर्ट हे एक लँड मार्क बनले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.