Press "Enter" to skip to content

अनधिकृत क्रशर च्या प्रदूषणाने नागरिक त्रस्त

पनवेल – जे एन पी टी रस्त्यावर विषारी धूळ रोखत आहे वाहन चालकांचा श्वास

पनवेल : प्रतिनिधी

आपण जर पनवेल – जे एन पी टी – उरण रस्त्यावरून प्रवास करत असाल तर सावधान…. या रस्त्यावर सर्वत्र पसरलेले धुळीचे साम्राज्य आपला जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. आणी याला जबाबदार आहे ते या भागात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या अनधिकृत क्रशर व्यवसाय आणि त्यातून तयार होणारी खडी, ग्रिट याची वाहतूक.

प्रशासनाकडून या क्रशर वर काही दिवसांकरिता बंदी घालण्यात येते मात्र अधिकाऱ्यांचे हात ओले झाले की हा व्यवसाय जोमाने सुरू होतो. या आधी हे क्रशर चालक उडणारी धूळ कमी करण्यासाठी रस्त्यावर टँकर ने पाणी मारण्याचे काम करीत होते. मात्र आता या धंदेवायिकांना आपल्या फायद्यापुढे लोकांच्या जीवाची परवा उरलेली नाही.

या धुळीच्या प्रदूषणाबाबत आम्ही या क्रशर मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “या आधी आम्ही रस्त्यावर पाणी मारण्याचे काम करत होतो परंतु आता आम्ही पाणी मारत नाही. कारण ज्या टँकर मालकाला आम्ही हे काम दिले होते त्याचे पैसे देखील आम्ही दिले नाहीत.”

अर्थात हे क्रशर चालक नफा कमावतात परंतु हे पैसे कमावताना आपला खिसा थोडाही रिकामा होऊ नये मग त्या बदल्यात हजारो नागरिकांच्या जिवाला धोका झाला तरी चालेल अशी या व्यावसायिकांची भूमिका आहे.

दरम्यान या प्रकरणी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी आंदोलन करण्याची भूमिका पनवेल तालुका पत्रकार विकास मंच घेईल असे जाहीर करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.